हवामान

EL Nino Update: सुखद बातमी! येणाऱ्या 2 महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी, वाचा कसा राहील पुढील वर्षी मान्सून?

EL Nino Update:- यावर्षी राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये एल निनोचा प्रभाव मान्सून काळातील पावसावर दिसून आला व त्यामुळे 2023 मध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा देखील कमी पावसाची नोंद झाली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

जवळजवळ राज्यामध्ये नऊ जिल्ह्यात अपुरा पाऊस नोंदवला गेला. ही सगळी परिस्थिती उद्भवली ती प्रशांत महासागरातील एल निनोच्या प्रभावामुळे. जवळजवळ कृषी क्षेत्र यामुळे प्रभावित झाले. परंतु आता येणाऱ्या वर्षात किंवा येणाऱ्या मान्सून कालावधीत एल निनोचा प्रभाव पावसावर राहील की राहणार नाही?

हा सगळ्यात मोठा प्रश्न देशातील शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. परंतु अशा परिस्थितीत एक सुखद आणि दिलासादायक बातमी समोर आली असून आगामी मान्सून हंगामाकरिता ही बातमी खूप दिलासादायक आहे असेच म्हणावे लागेल.

 दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव होणार कमी

आगामी मान्सून हंगामाकरिता एक सकारात्मक बातमी समोर आली असून येणाऱ्या मान्सून हंगामामध्ये पाऊस सर्वसाधारण राहील अशी शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. कारण प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव हा येणाऱ्या दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तवली आहे.

आगामी मान्सून हंगामाच्या अगोदर प्रशांत महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येतील असे संकेत अमेरिकन हवामान शास्त्र संस्था नोआने दिले आहेत. त्यामुळे आगामी मान्सून हंगामाकरीता आहे बाब खूप दिलासादायक मानली जात आहे. त्यामुळे साहजिकच एल निनोचा प्रभाव किंवा शक्यता नसल्यामुळे पाऊसमान सर्वसाधारण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 काय म्हणाले हवामान अभ्यासक?

हवामान अभ्यासाक मयुरेश प्रभुणे यांनी याबाबत माहिती दिली व या माहितीचा आधार घेऊन जर पाहिले तर येत्या दोन महिन्यांमध्ये प्रशांत महासागरातील एल निनो चा प्रभाव ओसरण्याचा अंदाज असून एप्रिल ते जून महिन्यात प्रशांत महासागराचा तापमानात घसरण होण्याची शक्यता जवळपास 73% आहे.

याशिवाय ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात प्रशांत महासागराचे तापमान यापेक्षा जास्त कमी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे प्रशांत महासागरात ला नीना निर्माण होण्याची शक्यता 50 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत पावसात सर्वसाधारण किंवा सरासरीपेक्षा अधिक देखील पडेल असा अंदाज आहे.

 एल निनो म्हणजे नेमके काय?

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जाते तेव्हा त्याला एल निनो असे म्हटले जाते. म्हणजेच प्रशांत महासागराचे सरासरी तापमानापेक्षा तापमानात 0.5 अंशांची वाढ झाल्यास किंवा त्यापेक्षा अधिक तापमान झाल्यास एल निनोची परिस्थिती उद्भवते.

त्यामुळे या परिस्थितीचा जगभरातील वाऱ्यांच्या प्रणालीवर परिणाम दिसून येतो व हवामानात देखील बदल होतो. या कालावधीमध्ये मान्सून काळात बाष्पाचे प्रमाण कमी होते व पाऊस किंवा मान्सून कमी होतो. म्हणून या परिस्थितीमुळे यावर्षी महाराष्ट्रात अपुरा पाऊस झाला.

Ajay Patil

Recent Posts