Havaman Andaj : मान्सूनचे जून, जुलै अन ऑगस्ट हे तीन महिने पूर्ण झाले आहेत. आता फक्त मान्सूनचा शेवटचा महिना बाकी राहिला आहे. मान्सूनच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात चांगला जोरदार पाऊस झाला आहे. सुरुवातीला जून मध्ये पावसाचा जोर फारच कमी पाहायला मिळाला. पण, जुलैमध्ये पावसाने चांगले कमबॅक केले आणि जून महिन्यांमधील पावसाची तूट भरून निघाली.
ऑगस्ट महिन्यात तर जुलै पेक्षाही भारी ठरला. ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात पावसाचे धुमशान पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी अक्षरशः पूर सदृश्य परिस्थिती तयार झाली. महत्वाचे म्हणजे आता सप्टेंबर महिना देखील तसाच राहणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या कोणकोणत्या तारखांना पावसाची शक्यता आहे या संदर्भात भारतीय हवामान खात्याकडून एक महत्त्वाचे अपडेट देखील समोर आले आहे.
कोण कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस
भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज आणि उद्या अर्थातच एक आणि दोन सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
जोरदार पावसाचा अंदाज
उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिकमध्येही या काळात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. फक्त हे दोन दिवसच नाही तर आजपासून पाच ते सहा सप्टेंबर पर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती तयार होऊ शकते आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होऊ शकते अशी भीती देखील व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपिकांची आणि सर्वसामान्य नागरिकांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
पावसाची तीव्रता वाढणार
आय एम डी च्या म्हणण्यानुसार विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील सर्वच्या सर्व 7 जिल्ह्यांमध्ये 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर दरम्यान पावसाची तीव्रता वाढणार आहे. या काळात या जिल्ह्यांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज आहे.
आठ जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस
तसेच या काळात पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व पाच जिल्ह्यांमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिकमध्येसुद्धा पावसाचा जोर अधिक राहणार आहे. उद्या दोन सप्टेंबरला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड या आठ जिल्ह्यांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज आहे.
चक्रीवादळाची काळजी ?
दुसरीकडे हवामान खात्याने अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताच विपरीत परिणाम होणार नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. त्यामुळे चक्रीवादळाची काळजी करण्याचे कारण नसल्याचे बोलले जात आहे.
ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाची शक्यता
12 ते 16 सप्टेंबर 2024 दरम्यान राज्यभरात चांगला पाऊस होणार आहे. म्हणजेच जसा ऑगस्ट महिना ठरला तसाच सप्टेंबर महिनाही राहणार आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.
शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती
त्यामुळे यंदा गेल्या वर्षी सारखी दुष्काळ सदृश्य परिस्थिती राहणार नाही. मात्र जास्तीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती मात्र आहे. तथापि या जास्तीचा पावसाचा रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे. रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना चांगली कमाई मिळणार आहे.