हवामान

पाथर्डी, श्रीगोंदा, करंजी घाट, आष्टीमध्ये अतिवृष्टी ! पंजाबराव डख यांचा अंदाज

रविवार (दि.१) सप्टेंबरच्या दुपारनंतर पुढील दोन दिवस करंजी घाट, पाथर्डी, आष्टी, श्रीगोंदा व नगर या भागात अतिवृष्टी होऊन पाझर तलाव तुडुंब भरतील, नदी नाले ओसंडून वाहतील, अशी माहिती हवामान तज्ज्ञ डॉ. पंजाबराव डख यांनी दिली असून, त्यादृष्टीने शेतकरी बांधवांनी सतर्क राहून शेतीविषयीचे नियोजन करावे, असे आवाहन डख यांनी केले आहे

अतिवृष्टीने करंजी घाट, आष्टी, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांतील पाझर तलाव हमखासपणे पाण्याने तुडुंब भरतील, असा विश्वासदेखील डख यांनी व्यक्त केला आहे. या पावसाची जोरदार सुरुवात रविवार दुपारनंतर होईल,

असा अंदाज व्यक्त करत शेतकऱ्यांनी त्या दृष्टीने शेतीचे व चाऱ्याचे नियोजन करावे, असे डख यांनी म्हटले आहे. रविवारी दुपारनंतर करंजी घाट परिसरात जोरदार पावसाला सुरुवातदेखील झाली असल्याने शेतकऱ्यांनी देखील त्या दृष्टीने नियोजन सुरू केले आहे.

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts