हवामान

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्ह्यात किती पाऊस झाला ? पहा तुमच्या तालुक्यातील आकडेवारी

Ahmednagar Rain : अहमदनगर जिल्हावासीयांवर गणपती बाप्पाची कृपा झाली. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीच्या ९२ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी हे प्रमाण १२८.३ टक्के होते.

तर नाशिक डिव्हिजनमध्ये ७७.९ टक्के पाऊस झाला. मागील वर्षी हे प्रमाण १११ टक्के होते. अहमदनगरमध्ये मागील आठवड्यात गुरूवार (दि.21) पासून पावसाला सुरूवात झाली. काही तालुक्यांत अतिवृष्टी झाली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर असल्याने खरीप हंगामातील पिकाला जीवनदायी ठरला आहे.

या पावसाने रब्बी हंगामातील पिकांची सोया झाली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेतकर्‍यांसह नागरिकांचा पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून अनेक भागात दमदार पाऊस हजेरी लावत आहे. दक्षिणेतील पारनेर, शेवगाव, नगर, नेवासा तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. श्रीरामपूर, राहुरी, राहाता आणि संगमनेर तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी आहे.

चौकट – पावसाची तालुकानिहाय सरासरी टक्केवारी (जून ते सप्टेंबर)

नगर-११०.१, पारनेर-११६.३, श्रीगोंदा-११०.६, कर्जत-९२, जामखेड-९१.३, शेवगाव-१००.३, पाथर्डी-१०४.१, नेवासे-८५.८, राहुरी-६३.४, संगमनेर-८१.८, अकोला-१०४.१, कोपरगाव-७१.२, श्रीरामपूर-४७.२, राहाता-७२.८

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts