हवामान

IMD Alert Maharashtra : दिलासादायक! अनेक भागात मान्सून सक्रिय; आता राज्यातील ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

IMD Alert Maharashtra : पावसाने राज्यात यावर्षी उशिरा सुरुवात केली आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असणारा बळीराजा आता सुखावला आहे. कारण राज्यातील अनेक भागात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

काही ठिकाणी तर विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झालं आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज.

https://twitter.com/Indiametdept/status/1673637466677596162?s=20

या भागात पडत आहे पाऊस

एनसीआरमध्ये काल रात्रीपासून पाऊस पडत असून मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे.तसेच किनारपट्टीवरील कर्नाटक, कोकण, मध्य प्रदेशचा काही भाग आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधील अनेक भागात पाऊस पडत आहे. तसेच पावसामुळे वाढत्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यास मोठी होत आहे.

मागील 24 तासांत पंजाब आणि हरियाणाच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडत आहे. हवामान खात्याने याबाबत माहिती दिली असून हवामान खात्याच्या अहवालानुसार, मागील 24 तासांत हरियाणातील रोहतक, नारनौल, कर्नाल, कुरुक्षेत्र तसेच गुरुग्राम, अंबाला, सिरसा आणि भिवानी या ठिकाणी पाऊस झाला. तर दुसरीकडे पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, फरीदकोट, फिरोजपूर आणि पठाणकोटमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे.

हवामान

हवामान खात्याने सोमवारी सांगितले होते की, पुढील 5 दिवसांत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि वायव्येकडील मैदानी भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच राजस्थानमध्ये 29 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशला मंगळवारीही जोरदार पाऊस पडणार आहे. 27 जून रोजी उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मध्य भारतात, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात 3-4 दिवस पाऊस सुरूच राहणार आहे. देशाच्या पूर्व भागात 2 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील 5 दिवस ईशान्य भारतात पाऊस पडू शकतो. 30 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण आणि गोव्यातील घाटांवर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.

अलर्ट जारी

येत्या 24 तासांत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज पाहता मध्य प्रदेशातील आठ जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच 22 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राजस्थानमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

देशातील 80 टक्के ठिकाणी मान्सून दाखल झाला आहे असे हवामान खात्याचे मत आहे. पुढे हवामान खात्याने असेही सांगितले की नैऋत्य मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि पश्चिम हिमालयीन प्रदेशांच्या काही भागांमध्ये पुढे सरकत आहे.

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यातील औट या ठिकाणी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे चंदीगड-मनाली महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकून पडले होते. 70 किमी लांबीचा मंडी-पंडोह-कुल्लू रस्ता खराब झाला असून राज्यात मुसळधार पावसामुळे एकूण 301 रस्ते बंद करण्यात आले आहेत, तर 140 वीज ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts