IMD Rain Alert In Maharashtra : महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये सध्या मान्सूनचा जोरदार पाऊस कोसळत आहे. यंदा मान्सून उशिरा जरी दाखल झाला असला तरी तो सध्या मुसळधार कोसळत आहे. येत्या काही तासांमध्ये मान्सून आणखी मुसळधार कोसळणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईसह महाराष्ट्राच्या अनके भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंअबीमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. तसेच आता राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
आज सकाळपासून मुंबईमध्ये सतत पाऊस कोसळत आहे. पुढील ३ ते ४ तास आणखी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांमध्ये येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या मान्सून महाराष्ट्रातील अनेक भागात कोसळत असला तरी काही भागात अजूनही पाऊस पडला नसल्यचे चित्र आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस पडला नसल्यामुळे शेतीकामे देखील रखडली आहेत.
तसेच ज्या भागामध्ये पाऊस झाला आहे त्या भागातही शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांसाठी शेतीकामे करण्यास सुरुवात केली आहे. जरी पाऊस कोसळत असला तरी हवामान विभागाकडून पेरणीयोग्य पाऊस पडल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.
भारतीय हवामान विभागाकडून मुंबई. ठाण्यासह ९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या 9 जिल्ह्यांमध्ये काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच हवामान खात्याकडून मुंबई, ठाणे, पालघरसह 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस पालघर आणि रायगड, पुढील दोन दिवस ठाणे आणि रत्नागिरी आणि आज मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
१ जुलैनंतर हवामान योग्य राहणार
हवामान विभागाकडून आज आणि उद्या मुंबईत यलो अलर्ट जारी ठेवण्यात आला आहे. तसेच १ जुलैनंतर मुंबईतील हवामान योग्य राहील असा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईमध्ये शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 45-55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.