हवामान

सावधान ! अरबी समुद्रात तयार होतंय बायपरजॉय चक्रीवादळ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात वादळी पाऊसाचा धोका, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Cyclone : राज्यासह जवळपास संपूर्ण भारतात मान्सूनची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहिली जात आहे. भारतीय शेती हे सर्वस्वी मान्सूनच्या पावसावर आधारित आहे. जवळपास 70 ते 80 टक्के शेती ही मान्सूनच्या पावसावर आधारित असल्याने मान्सूनचे आगमन केव्हा होणार? याकडे शेतकऱ्यांसहित जाणकार लोकांचे देखील मोठे बारीक लक्ष लागून आहे.

अशातच मात्र शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक चिंतेची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मान्सूनचे आगमन यावर्षी जवळपास सात ते आठ दिवस उशिराने होणार आहे. खरंतर केरळमध्ये मान्सून एक जूनला येतो आणि तळकोकणात सात जूनला मान्सूनचे आगमन होते. 

हे पण वाचा :- नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

यंदा मात्र केरळमध्ये मान्सून 10 ते 11 जून च्या सुमारास दाखल होईल असा ढोबळमानाने अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. यानंतर तेथून पाच ते सहा दिवसात अर्थातच 15 ते 16 जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. अशातच मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार झाले आहे.

या चक्रीवादळाचा धोका किनारपट्टीवर असलेल्या राज्यांना आहे. यात गुजरात आणि महाराष्ट्राला या चक्रीवादळाचा अधिक धोका असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 8 जून ते 12 जून पर्यंत समुद्राकिनाऱ्यालगतच्या भागांना अलर्ट जारी होणार आहे. या काळात चक्रीवादळाची तीव्रता वाढणार आहे.

हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

काय म्हटलं हवामान विभागाने

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. येत्या दोन दिवसात याचे चक्रीवादळात रूपांतर होईल अस आयएमडीने स्पष्ट केले आहे.

अरबी समुद्रात तयार होणाऱ्या या चक्रीवादळाला बायपरजॉय चक्रीवादळ असं संबोधलं जात आहे. बायपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे तर महाराष्ट्रातील काही भागात यामुळे उष्णतेची लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा

या चक्रीवादळामुळे आज आणि उद्या गुजरात मधील बनासकांठा, साबरकांठा, अरवली जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. यासोबतच पाटण, मोडासा, मेहसाणासह इतर भागातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर या चक्रीवादळाचा प्रभाव राहणार असून या भागात सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता कायम आहे. दरम्यान मासेमारी करणाऱ्यांना चक्रीवादळाची भीती लक्षात घेता समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मात्र विदर्भात 7 जून ते नऊ जून दरम्यान उष्णतेची लाट येणार असल्याचे आयएमडीने सांगितले आहे. निश्चितच या चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला अडथळे येत असून मान्सून आगमनास विलंब होत आहे एवढे नक्की.

हे पण वाचा :- पीएम कुसुम योजना : 95 टक्के अनुदानावर सौर कृषीपंप हवा असेल तर ‘ही’ कागदपत्रे तयार ठेवा, इथं करा अर्ज

Ajay Patil