हवामान

Maharashtra Havaman: कसे राहील येणाऱ्या सात दिवसात राज्यातील हवामान? थंडी वाढेल की पडेल पाऊस! वाचा माहिती

Maharashtra Havaman:- सध्या हिवाळ्याचा कालावधी सुरू असून नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी संपूर्ण राज्यात जाणवते असा पूर्वीपासून अनुभव आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर अजून देखील हव्या त्या प्रमाणामध्ये थंडी जाणवत नाही. सकाळच्या वेळेला थंडी जाणवते.

परंतु दुपारी बऱ्याच ठिकाणी उकाडा जाणवत असल्याचे देखील सध्या चित्र आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी गारपीट व जोरदार पाऊस झालेला होता. यामुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच डिसेंबर महिन्याची सुरुवात देखील अवकाळीचे संकट घेऊनच झाली.

परंतु या कालावधीमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडला त्याचा जोर काहीसा कमी असल्याने त्यामुळे दिलासा मिळाला. सध्या गेल्या काही दिवसांपासून कुठेही पावसाने हजेरी लावलेली नाही. परंतु बऱ्याच ठिकाणी अजून देखील ढगाळ हवामान असल्याचे दिसून येत आहे.

याचा परिणाम हा राज्यातील कमाल तापमानावर दिसून येत असून अजून देखील कमाल तापमानामध्ये घट झालेली नाही. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी कमाल तापमान जास्त असल्याने अजून देखील थंडीची जाणीव होताना दिसून येत नाही. तसेच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज वर्तवला आहे.

परंतु कडाक्याची थंडीसाठी किती काळ वाट पाहावी लागणार? हादेखील एक मोठा प्रश्न आहे. जर आपण देशातील पंजाब, हरियाणा तसेच छत्तीसगड इत्यादी राज्यांचा विचार केला तर या ठिकाणी थंडीचा जोर वाढला असून काही ठिकाणी किमान तापमान सहा ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.

 सध्या काय आहे राज्यामध्ये थंडीची स्थिती?

सध्या आपण राज्याचा विचार केला तर काही ठिकाणी थंडी जाणवू लागली असून सकाळी सकाळी मात्र अंगात हुडहुडी भरेल अशी थंडी असते तर दुपारी तापमानात मात्र कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. म्हणजेच किमान तापमानामध्ये देखील घसरण होत आहे व तरीदेखील कमाल तापमानात देखील वाढ होत असल्याचे सध्या चित्र आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर काल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 35.5 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली. निश्चितच यामागे अवकाळी पाऊस, नुकतेच होऊन गेलेले चक्रीवादळ इत्यादी गोष्टींचा प्रभाव हा तापमानावर आणि वातावरणामध्ये मोठा बदल होण्यासाठी कारणीभूत ठरताना दिसून येत आहे.

राज्यामध्ये पुढील सात दिवस कोरडे वातावरण राहणार असल्याचे देखील हवामान विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. परंतु कमाल तापमानामध्ये वाढ होत असताना  सकाळी मात्र किमान तापमानात देखील घसरण झाल्याचे सध्या चित्र असल्यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी घामाच्या धारा अशी विरोधी टोकाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जर आपण गेल्या दोन दिवसाचा राज्यातील काही भागातील किमान तापमानाचा विचार केला तर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये 15.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर नाशिक जिल्ह्यात 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे. त्यासोबतच अहमदनगर जिल्ह्यात देखील 14.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

त्यामुळे कडाक्याची थंडी राज्यात कधी जाणवेल? हा मोठा प्रश्न आहे.

Ajay Patil

Recent Posts