Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे. आपल्या नवीन अंदाजात पंजाबरावांनी 30 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहील? ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहील? प्रत्यक्षात कडाक्याच्या थंडीला कधीपासून सुरुवात होणार? यासंदर्भात पंजाबरावांनी डिटेल माहिती दिली आहे.
कस राहणार राज्याचे हवामान ?
पंजाबरावांच्या मते, आज 14 सप्टेंबर पासून ते पुढील सहा ते सात दिवस म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. या काळात महाराष्ट्रात पावसाची विश्रांती पाहायला मिळू शकते.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात आपले सोयाबीन काढून एखाद्या सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावे असे आवाहन पंजाबरावांनी केले आहे. कारण की, 20 तारखेनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 21 सप्टेंबर पासून पावसाला सुरुवात होईल आणि सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील काही भागात 2 ऑक्टोबर पर्यंत पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यात खूप मोठा पाऊस पडणार असा अंदाज आहे. यामुळे जोपर्यंत पावसाची उघाड आहे तोवर सोयाबीनची काढणी करून घ्यावी. महत्त्वाचे म्हणजे ऑक्टोबर मध्ये देखील शेवटपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे.
ऑक्टोबर महिन्याचे सुरुवातीचे दोन दिवस त्यानंतर सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर दरम्यान म्हणजेच विजयादशमीच्या कालावधीत आणि 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यंदा 5 नोव्हेंबरला प्रत्यक्षात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान कुठं बरसणार मुसळधार पाऊस
21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, अहमदनगर , पुणे, बीड या भागात पावसाची शक्यता आहे. या संबंधित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे.
या काळात विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता आहे. खरेतर या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडणार असा अंदाज आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण काहीसे अधिक राहणार आहे.