Maharashtra Rain : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आजपासून अर्थातच गणरायाच्या आगमनापासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. या काळात विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये 12 सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
दरम्यान पंजाबरावांनंतर आता भारतीय हवामान खात्याने देखील एक नवीन अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार आज पासून 9 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सात ते नऊ सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणार या संदर्भात भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या नवीन अंदाज अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
7 सप्टेंबर 2024 : आज पूर्व आणि पश्चिम विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच कोकणातील रायगड आणि पुण्यातील सातारा या दोन जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
8 सप्टेंबर : विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या 11 जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील दक्षिणेकडील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे अन सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
9 सप्टेंबर : नऊ तारखेला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, वाशिम या 11 जिल्ह्यांना उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्र विभागातील पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.