Maharashtra Rain : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. महत्वाचे म्हणजे काल बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असणारा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे.
काल भारतीय हवामान खात्याने पूर्व विदर्भात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली होती. या पार्श्वभूमीवर काल नऊ सप्टेंबरला पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता.
यानुसार पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये काल जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डीप डिप्रेशनच्या प्रभावामुळे आजही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज दिला आहे.
उद्या सुद्धा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली असून या सदर जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याचा नवीन अंदाज
10 सप्टेंबर 2024 : आज पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये अर्थात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना देखील आज येलो अलर्ट देण्यात आला आहे.
11 सप्टेंबर : उद्या मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, संपूर्ण खानदेश आणि विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अर्थातच उद्या पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे.