Maharashtra Rain:-सध्या महाराष्ट्रातील पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून काही भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. आठवडाभराचा विचार केला तर राज्यातील बहुतेक भागात चांगला पाऊस(Rain) झाल्यामुळे अनेक ठिकाणी उद्भवू शकणारी पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात मिटण्यास मदत झाली असून खरिपातील(Kharif Session)रखडलेल्या पेरण्यांना देखील वेग आला आहे.
परंतु कालपासून पावसाचा वेग जरा मंदावल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. परंतु तरी देखील राज्यातील काही भागांमध्ये पुढील 48 तासात अति मुसळधार(Heavy Rain)ते तीन ते चार दिवसात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.
पुढील 48 तास राज्यातील या भागात पडणार मुसळधार ते अति मुसळधार पाऊस
राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहण्याची शक्यता असून येत्या तीन ते चार दिवसात पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात(Maharashtra)पावसाचे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच पालघर जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांना देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
एल निनोबाबत जागतिक हवामानशास्त्र संस्थेने केली घोषणा
प्रशांत महासागरामध्ये एलनिनोची स्थिती निर्माण झाल्याचे जागतिक हवामानशास्त्र संस्थेने जाहीर केले असून चालू वर्षाच्या उत्तरार्धामध्ये देखील ही स्थिती कायम राहण्याची शक्यता 90% पर्यंत असून यामुळे हवामान बदल तसेच जागतिक तापमान वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी जागतिक हवामान शास्त्र संस्थेने एल निनो किती जुलैमध्ये विकसित होईल अशी एक शक्यता वर्तवली होती.
परंतु अमेरिकेतील एनओएए या संस्थेच्या हवामान अंदाज विभागाने जवळपास महिनाभर आधीच म्हणजेच आठ जूनलाच ही स्थिती निर्माण झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता जागतिक हवामान शास्त्र संस्थेने देखील अधिकृतरित्या एल निनो स्थितीची माहिती दिली आहे. ही स्थिती जुलै ते सप्टेंबर या कालावधीत राहण्याची शक्यता असून या वर्षाच्या शेवटी पर्यंत त्याचे परिणाम बघायला मिळतील
एल निनोस्थितीमुळे काय होऊ शकतात परिणाम?
एल निनोची स्थिती निर्माण झाल्यामुळे त्याचा परिणाम जीवनमानावर होण्याची शक्यता आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तापमानाचे विक्रम मोडले जाणे तसेच जगामध्ये बऱ्याच ठिकाणी तीव्र उष्णता असे त्याचे स्वरूप असू शकते. या पार्श्वभूमीवर या स्थितीचा जीवनमानावर कमीत कमी परिणाम व्हावा याकरिता तीव्र हवामान बदलाबाबत पूर्व इशारा आणि त्या अनुषंगाने पूर्वतयारी करणे गरजेचे असल्याचे मत जागतिक हवामानशास्त्र संस्थेचे प्रा.पेट्टेरी तालास यांनी नमूद केले आहे.