Maharashtra Rain:- यावर्षी भारतात मानसून दाखल झाल्यानंतर त्याचा संपूर्ण प्रवास हा खूपच समाधानकारक असल्याचे दिसून आले असून मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे व मुंबईमध्ये देखील पावसाची रिमझिम सध्या सुरू असल्याचे चित्र आहे. तसेच आता राज्यातील बऱ्याच भागांमध्ये पावसाने चांगला जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे व साधारणपणे अजून दोन दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनच्या माध्यमातून व्यापला जाईल अशी शक्यता आहे.
सध्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पेरण्यांना वेग आला आहे व समाधानकारक पावसामुळे शेतकरी सुखावल्याचे चित्र आहे. तसेच या दरम्यान महाराष्ट्रामध्ये पुढील चार दिवस पावसाची शक्यता कायम असून मुंबई तसेच रायगड, पालघर, ठाणे इत्यादी जिल्ह्यांसह कोकणामध्ये पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील या जिल्ह्यांना आहे पावसाचा यलो अलर्ट
पावसाच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून राज्यातील ठाणे तसेच मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून या जिल्ह्यांशिवाय अहमदनगर तसेच कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सोलापूर या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भामध्ये होईल मुसळधार पाऊस?
बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया इत्यादी विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे व हवामान विभागाच्या माध्यमातून विदर्भातील काही जिल्ह्यांना पुढील चार दिवसांकरिता पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांमध्ये कोसळणार पावसाच्या जोरदार सरी
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे व काही भागांमध्ये विजांचा कडकडाट व त्यासोबत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याशिवाय पालघर तसेच पुणे, अहमदनगर, सातारा तसेच धाराशिव, बीड, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे.
त्यासोबतच कोकण व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजाच्या कडकडाटासह पाऊस होईल व पन्नास ते साठ किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसायट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.