Maharashtra Rain : ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर महाराष्ट्रातून हद्दबाहेर झालेला पाऊस आता पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक करणार असे भासत आहे. खरंतर गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस झाला. कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अक्षरशा पूरस्थिती तयार झाली.
ऑगस्टची सुरुवात देखील दमदार पावसाने झाली. यामुळे मात्र राज्यातील काही भागांमध्ये सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.
पण आता गेल्या नऊ-दहा दिवसांपासून पावसाने चांगलाच ब्रेक घेतला आहे. पावसाने ओढ दिली असल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पावसामुळे काही भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आणि आता पाऊस ओढ देत असल्याने काही भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
अशातच मात्र भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे. आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे आता पुन्हा एकदा पावसाचे कमबॅक होणार आहे. हवामान खात्याने आधी 18 ऑगस्ट पासून म्हणजेच येत्या दोन दिवसांनी जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज जारी केला होता.
मात्र सध्याची परिस्थिती पाहता पाऊस लवकरच कमबॅक करण्याची शक्यता आहे. सध्याची परिस्थिती जोरदार पावसासाठी पोषक असून हवामान खात्याने आजपासूनच राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि संपूर्ण मराठवाडा तसेच विदर्भात आज पासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने 18 ऑगस्टपासून पाऊस सक्रिय होणार असल्याचे अंदाज वर्तवले होते.
मात्र, त्याआधीच पाऊस सक्रिय झाला असल्याने राज्यातील बहुतांश भागांमधील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आजपासून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथे पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. येथे आगामी काही दिवस पावसाची शक्यता आहे.
तसेच संपूर्ण मराठवाडा म्हणजेच छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, जालना या जिल्ह्यात आणि विदर्भात आगामी तीन दिवस म्हणजे 18 ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे ज्या भागातील शेती पिकांना पावसाची आवश्यकता होती अशा भागातील पिकांना नवीन संजीवनी मिळणार आहे.