यावर्षी मान्सूनचे देशातील आगमन पाहिले तर ते साधारणपणे अंदमान समुद्रामध्ये 19 मे रोजी झाले होते. त्यानंतर 30 मे या दिवशी संपूर्ण अंदमान निकोबार बेट समूह मान्सूनने व्यापला होता. त्यानंतर केरळमध्ये देखील आठ जून रोजी मोठ्या दिमाखात मान्सूनचे आगमन झाले. त्याच्यानंतर तीन ते चार दिवसात मान्सूनने कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील हजेरी लावली होती. परंतु मध्यंतरीच्या कालावधीमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाने हजेरी लावल्यामुळे तब्बल मान्सून 12 दिवस रखडला व त्याची वाटचाल थांबली होती.
त्यानंतर माणसाला पोषक वातावरण तयार झाल्यामुळे 13 जून रोजी पूर्व विदर्भात मान्सूनने चांगली प्रगती केल्यानंतर 24 जूनला महाराष्ट्राचा बराच भाग व्यापला. 25 तारखेला मानसून ने वेगाने प्रगती केली व संपूर्ण महाराष्ट्र तसेच देशातील बहुतांश भागात पोचला. रविवारी देशातील राजस्थान,हरियाणा व पंजाबचा उर्वरित भागात देखील मान्सून पोहोचला असून संपूर्ण देशात मान्सूनचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
परंतु या सगळ्या घडामोडी मध्ये जर महाराष्ट्रातील मान्सूनची स्थिती पाहिली तर ती समाधानकारक नाही. अजून देखील राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पेरण्या रखडले असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज कोकणात असलेल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
तसेच घाटमाथ्यावर देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट हवामान शास्त्र विभागाने दिलेला आहे. तसेच राज्याच्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात देखील पावसाच्या सरी पडल्या.
राज्यातील या जिल्ह्यात पुढील पाच दिवस पावसाचा इशारा
राज्यातील नाशिक,पुणे,ठाणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून पुढील पाच दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला.
सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्याने संपूर्ण देश व्यापल्यामुळे कर्नाटक किनारपट्टी आणि संपूर्ण कर्नाटक तसेच ईशान्य भारतातील हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम आणि मेघालय तसेच अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि मनिपुर या राज्यांमध्ये देखील पावसाला पोषक वातावरण तयार झालेले आहे. तसेच देशाच्या वायव्येकडील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी वीज तसेच मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे.