हवामान

Maharashtra Rain: आज राज्यात ‘या’ ठिकाणी आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट, वाचा तुमच्या जिल्ह्यात काय राहील पावसाची स्थिती?

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा हवामान(Climate)खात्याकडून देण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस होत असून  अनेक ठिकाणी यांना पूर देखील आले आहेत.

पेरणी योग्य चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील सुखावला असून रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या

(Kharif Sowing)नी आता वेग घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण सध्या पावसाचा अंदाज पाहिला तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे अरे काही दिवस राज्याच्या भागामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसापासून चातकासारखी वाट पाहायला लावणारा पाऊस(Rain) आता राज्यात सक्रिय झाला आहे.

 राज्याच्या या जिल्ह्यात हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट

या अनुषंगाने राज्याच्या जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाकडून पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आज कोकण तसेच विदर्भ आणि राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट(Orange Alert)जारी करण्यात आला असून यामध्ये पालघर, रत्नागिरी, सातारा, वर्धा, नागपूर आणि गोंदिया इत्यादी जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता असून  पुण्यात मात्र आज काहीशी विश्रांती राहील असा अंदाज आहे.

कोकणामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून त्या ठिकाणी बऱ्याच पाणीसाठांमध्ये चांगली वाढ झालेली आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस झाल्यामुळे या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणारे शिळधरण देखील ओसंडून वाहत आहे. हीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यात देखील असून नाशिक जिल्ह्यामध्ये देखील आठवडाभरात चांगला पाऊस झाल्याने धरण साठ्यामध्ये मध्ये पाच टक्क्यांची वाढ झालेली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts