Monsoon 2023 : यावर्षी पाऊस जरी केरळ आणि तळकोकणात आला असला तरी तो महाराष्ट्रातून गायबच झाला आहे. यामागचे कारण म्हणजे एल निनो आणि चक्रीवादळामुळे राज्यात पाऊस रखडला आहे. येत्या 23 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे.
सध्या आपल्याला हवामान खात्याच्या अंदाजावरून राज्यात कधी पाऊस पडेल हे समजत आहे. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे की पूर्वी कोणत्याच सुविधा उपलब्ध नसताना पावसाचा अंदाज कसा समजत होता. जाणून घेऊयात यामागचे उत्तर.
तुम्हाला असे वाटत असणार या सर्व गोष्टींपूर्वी हवामानाचा अंदाज कधीच केला आहे की नाही. परंतु ग्रामीण भागात उपग्रह आणि अत्याधुनिक उपकरणांशिवाय वडीलधारी मंडळी हवामानाचा अंदाज घेतात.
विज्ञानही घेते अनुमानाची दखल
डॉ. दीपक आचार्य यांच्या जंगल प्रयोगशाळेतील पुस्तकानुसार, जुन्या काळातील लोक झाडे आणि वनस्पतींचे उत्पन्न, प्राण्यांचे वर्तन पाहूनच हवामान किंवा पावसाळा याविषयी सांगायचे. खेडेगावात राहत असणाऱ्या वडिलधाऱ्यांचे असे अनेक भाकीत आणि त्यातील तथ्ये विज्ञानही गांभीर्याने घेते. आधुनिक विज्ञान त्याला जैविक सूचक मानत असल्याने अशा जैविक घटना ज्यांना सूचक मानले जाते.
महुआचे झाड
पूर्वी महुआचे झाड पाहून आदिवासी लोक हवामानाचा अंदाज अतिशय मनोरंजक पद्धतीने सांगायचे. त्यांच्या मतानुसार ज्या वर्षी उन्हाळ्यात महुआच्या झाडावर जास्त पाने असतात, त्यावेळी जास्त पाऊस पडतो.
बांबूच्या पानांचा रंग
जर उन्हाळ्याच्या बांबूच्या पानांमध्ये हिरवळ असेल तर खराब पावसाची बातमी येते. इतकेच नाही तर बांबूची पाने हिरवी असली की दुष्काळ पडतो, असेही मानण्यात येते.
बेर
असे मानण्यात येते की जर बेरचे झाड फळांनी भरलेले असल्यास त्या वर्षी सामान्य पावसाळा येण्याची शक्यता असते असे पाताळकोट खोऱ्यातील आदिवासी लोकांचे मत आहे. तर दुसरीकडे, जर उन्हाळ्याच्या दिवसात गवत खूप हिरवे दिसल्यास पावसाळा सामान्यपेक्षा चांगला आहे.