Monsoon 2024 : सध्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये वादळी पावसाचे सावट पाहायला मिळतं आहे. तसेच देशातील काही भागात प्रचंड उकाडा जाणवत आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे सध्या सुरू असलेला हा वादळी पाऊस केव्हा विश्रांती घेणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन गुड न्युज समोर आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वादळी पाऊस 19 मे ला विश्रांती घेणार आहे. 19 मे नंतर हवामान प्रामुख्याने कोरडे होणार असा अंदाज आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने यावर्षी मान्सूनचे वेळेआधीच आगमन होऊ शकते असे म्हटले आहे.
मान्सून 2024 संदर्भात भारतीय हवामान खात्याने नुकतीच एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान खात्यानुसार, यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होणार आहे. नैऋत्य मान्सून वेळेपूर्वी अंदमान निकोबारमध्ये दाखल होणार आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, 19 मे रोजी मान्सून अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सून देशाच्या इतर भागांकडे सरकणार आहे. खरे तर दरवर्षी मान्सूनचे अंदमानात 21 ते 22 जूनच्या दरम्यान आगमन होत असते.
यंदा मात्र दोन ते तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचणार आहे. यामुळे राज्यासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची वार्ता राहणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, देशात एल निनो प्रणाली कमकुवत होत आहे. तसेच, ला निनाची स्थिती ही सक्रिय होऊ लागली आहे. यामुळे यंदा चांगला मान्सून राहणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.
तसेच यंदा मान्सून हा वेळेपूर्वीचं भारतात येऊ शकतो. इंडियन ओशियन डायपोल अर्थातच आयओडी सुद्धा यंदा चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल होत आहे, जे की, मान्सूनसाठी सकारात्मक परिस्थिती तयार करत आहे.
महाराष्ट्रात कधी आगमन होणार ?
अंदमानात मान्सून 19 मे ला दाखल होणार आहे. तसेच मान्सून यंदा 1 जूनला केरळात दाखल होणार असा अंदाज व्यक्त होत आहे. बंगालच्या उपसागरातून भारताच्या मुख्य भूभागावर मान्सून सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे, त्यामुळे 19 मे पर्यंत मान्सून भारतात दाखल होईल, असा अंदाज आहे.
मान्सूनच्या आगमनाच्या सामान्य तारखेबद्दल बोलायचे तर तो 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचत असतो. खरे तर मानसून तळ कोकणात आठ जूनच्या सुमारास पोहोचतो. तळ कोकणात म्हणजेच सिंधुदुर्गात मान्सूनचे आठ जूनला आगमन होते मग तेथून पुढे मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पसरत असतो.
त्यामुळे यंदाही याचदरम्यान मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून मुंबईत 11 जूनच्या सुमारास दाखल होणार असा अंदाज आहे. एकंदरीत येत्या 25-26 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असा अंदाज आहे.