Panjab Dakh : शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज दिला आहे. या नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रात आगामी काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजा, वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज त्यांनी दिला आहे.
यामुळे काही भागात पूरस्थिती तयार होईल आणि सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. सोबतच या जास्तीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचेही नुकसान होण्याची भीती आहे.
कुठं पडणार मुसळधार पाऊस?
खरे तर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली. यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊसमान कसे राहणार याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र सप्टेंबर मध्ये पावसाने जोरदार कमबॅक केला आहे.
काही ठिकाणी 31 ऑगस्ट पासूनच पाऊस सुरू झाला आहे. 31 ऑगस्ट पासून मराठवाड्या कडन पावसाला सुरुवात झाली आहे. 31 ऑगस्ट च्या मध्यरात्री राज्यातील मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे.
तसेच काल एक सप्टेंबरला राज्यातील मराठवाडा विभागात एवढा मुसळधार पाऊस झाला आहे की अनेक नद्यांना पूर देखील आला आहे. दरम्यान, पंजाब रावांनी 5 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात असेच हवामान कायम राहणार असा अंदाज दिला आहे.
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे, या काळात राज्यभर पाऊस पडणार आहे. राज्यातील यवतमाळ, नांदेड, अकोला, बुलढाणा, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, पंढरपूर, अहमदनगर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजी नगर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तसेच यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीड, नगर, संभाजी नगर, सोलापूर, नाशिक, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव या 13-14 जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
एवढेच नाही तर नाशिक व आजूबाजूच्या भागात अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असे भाकीत पंजाबराव यांनी वर्तवले आहे. नाशिक आणि नगरमध्ये या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार असून या भागातील अनेक नद्यांना पूर येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
याशिवाय मांजरा आणि दुधना नदी सारख्या मराठवाडातील अनेक प्रमुख नद्यांना पूर येऊ शकतो. एवढेच नाही तर लवकरच जायकवाडी धरण फुल भरेल आणि जायकवाडी मधून पाणी सोडावे लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. यामुळे जायकवाडी धरणाच्या खालील भागांमध्ये पूरस्थिती तयार होऊ शकते.