Panjab Dakh News : जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या नवीन हवामान अंदाजात पंजाब रावांनी 26 जुलैपर्यंत महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याचे म्हटले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या काही दिवसांपासून राज्यात हलका ते मध्यम पाऊस सुरू होता. पण, काल अर्थातच 14 जुलैला राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरावर जोरदार पाऊस झाला आहे.
दरम्यान, पंजाब रावांनी 14 जुलै ते 26 जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे, महाराष्ट्रात 14 जुलै ते 18 जुलै या कालावधीमध्ये पावसाचा जोर सर्वात जास्त राहणार आहे.
राजधानी मुंबई बाबत बोलायचं झालं तर या काळात मुंबईमध्ये अगदी अतिवृष्टी सारखा पाऊस पडणार आहे. या काळात राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात चांगला जोरदार पाऊस पडणार आहे.
या काळात पावसाचा दोन दोन दिवसाचा मुक्काम राहणार आहे. 18 जुलै नंतर आणखी एकदा जोरदार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. 21 ते 26 जुलै दरम्यान महाराष्ट्रात पुन्हा एकदा चांगल्या जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
तत्पूर्वी 15 ते 17 जुलै दरम्यान राज्यातील पंढरपूर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, लातूर यासह पूर्व विदर्भातील सहा आणि पश्चिम विदर्भातील पाच या जिल्ह्यांमध्ये चांगला जोराचा पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे या काळात राज्यातील अनेक छोटे मोठे तळे भरून जातील. विशेष म्हणजे जे मोठे मोठे धरणे आहेत त्यामध्ये देखील पाण्याची आवक वाढणार आहे. या पावसामुळे मोठमोठ्या धरणांमध्ये दोन ते तीन टक्के पाणी वाढणार असा विश्वास पंजाब रावांनी बोलून दाखवला आहे.
एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या मुसळधार पावसाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपणार असे चित्र आहे. तथापि पंजाब रावांचा हा हवामान अंदाज कितपत खरा ठरतो ही गोष्ट खरंच पाहण्यासारखी राहणार आहे.