Panjab Dakh News : मध्यंतरी महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे गायब झाला होता. जवळपास एक आठवडा महाराष्ट्रात कुठेच पाऊस झाला नाही. यामुळे सर्वजण चिंतेत होते. शेतकरी बांधव देखील पावसाने उघडीप दिल्याने अडचणीत आले होते. मात्र 17 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
खरे तर 15 ऑगस्ट पासूनच पावक्रियता पासाची सहायला मिळत आहे. मात्र पावसाचा जोर हा 17 ऑगस्ट पासून वाढला आहे. पंजाब रावांनी मागील आपल्या एका अंदाज 17 ऑगस्ट पासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होणार असे म्हटले होते.
17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार असे त्यांनी आपल्या अंदाजात स्पष्ट केले होते. यानुसार महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पंजाबरावांचा हवामान अंदाज खरा ठरला असल्याचे शेतकरी बांधव आवर्जून नमूद करत आहेत.
तसेच शेतकऱ्यांमध्ये पंजाबरावांच्या पुढील हवामान अंदाजाबाबत जाणून घेण्याची उत्सुकता देखील आहे. अशातच पंजाब रावांनी एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात 4 सप्टेंबर पर्यंत म्हणजेच पुढील दहा दिवस पाऊसमान कसे राहणार याबाबत डिटेल माहिती देण्यात आली आहे.
काय म्हणतात पंजाबरावं
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात 27 ऑगस्ट पर्यंत मोठ्या पावसाची शक्यता आहे. या कालावधीत जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.
या काळात अगदी ओढ़े नाले भरून वाहतील असा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील प्रमुख धरणांमध्ये या पावसामुळे पाण्याची आवक देखील वाढण्याची शक्यता आहे.
या कालावधीत महाराष्ट्रातील यवतमाळ, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, सांगली, सातारा, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, कोकण, पुणे, पंढरपूर,जत, अहमदनगर, नाशिक, संगमनेर, शिर्डी, राहता, गंगापूर, वैजापूर, मालेगाव, जळगाव जामोद, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, पारोळा, साक्री, जळगाव, जालना या भागात पावसाची शक्यता आहे.
पाऊस लवकरच विश्रांती घेणार
27 तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र यानंतर महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार आहे. 28 ते 30 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात कडक सूर्यदर्शनाची शक्यता आहे.
या काळात राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील, पाऊस पडणार नाही असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. पण 31 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.