Panjab Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. पंजाबरावांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये हवामान कोरडे राहणार असे म्हटले आहे. राज्यात आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच पुढील तीन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
तथापि 30 आणि 31 ऑगस्टला पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे राहील असे पंजाब रावांचे म्हणणे आहे.
पण राज्यात बैलपोळ्यापासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. यंदा 2 सप्टेंबरला बैलपोळा असून या तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होईल. या कालावधीत राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
विभागनिहाय कुठं बरसणार मुसळधार पाऊस ?
पूर्व विदर्भ : पूर्व विदर्भात 30 आणि 31 ऑगस्टला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र एक सप्टेंबर पासून ते 4 सप्टेंबर पर्यंत या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम विदर्भ : पूर्व विदर्भ प्रमाणेच आज पासून 31 ऑगस्ट पर्यंत या विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. मात्र एक सप्टेंबर पासून या विभागात पावसाचा जोर वाढेल आणि 4 सप्टेंबर पर्यंत पाऊस सुरू राहणार असे पंजाब रावांचे म्हणणे आहे.
मराठवाडा : मराठवाड्यात दोन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र : या भागात 2 सप्टेंबर पासून ते सहा सप्टेंबर पर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या विभागात पुढील तीन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्र : उत्तर महाराष्ट्रात देखील दोन ते सहा सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. पण पुढील काही दिवस या भागात देखील पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस?
छत्रपती संभाजी नगर, धाराशिव, जालना, बीड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, वर्धा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील या 21 जिल्ह्यांमध्ये बैलपोळ्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे.
या काळात उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. मागे जसा पाऊस झाला होता तसाच पाऊस बैलपोळ्यापासून म्हणजे दोन सप्टेंबर पासून ते सहा सप्टेंबर पर्यंत पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतो.