हवामान

पंजाब डख : यंदा मान्सून केरळकडून येणार नाही; मग कुठनं येणार पाऊस? वाचा काय म्हटले डख….

Panjab Dakh : शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून 2023 संदर्भात. परभणीचे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी मान्सून संदर्भात एक महत्त्वाची अपडेट नुकतीच सार्वजनिक केली आहे. तसेच यावेळी पंजाब डख यांनी एक मोठा दावा देखील केला आहे.

पंजाब डख यांनी असा दावा केला आहे की, यंदा मान्सूनचे आगमन केरळ मधून होणार नाही. तर यंदा मान्सून हा पूर्वेकडून दाखल होणार आहे. म्हणजेच तेलंगाना कडून मान्सून येणार आहे. यामुळे यंदा देखील 2019 सारखीच परिस्थिती राहणार असून महाराष्ट्रात समाधानकारक मान्सून राहणार आहे. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

डख सांगतात की, जर मान्सूनचे पूर्वेकडून आगमन झाले तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस होत असतो. यंदा देखील पूर्वेकडून मान्सूनचे आगमन होणार असून यामुळे यावर्षी विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी बीड या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे. तसेच यंदा जून महिन्यात याआधी कधीही पडलेला नसेल असा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

हे पण वाचा :- खुशखबर ! मान्सून येत्या काही तासात केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात केव्हा? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

केव्हा येणार मान्सून?

भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचे आगमन पुढील 24 ते 48 तासात होणार असल्याचा अंदाज बांधला आहे. यानंतर तेथून साधारणता एका आठवड्यानंतर मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. पंजाब डख यांनी मात्र या अंदाजाच्या अगदी उलट अंदाज वर्तवला आहे.

डख यांनी वर्तवलेल्या सुधारित मान्सून अंदाजानुसार, यंदा मान्सूनचे राज्यात आठ जूनला अर्थातच उद्या आगमन होणार आहे. निश्चितच डख यांचा हा अंदाज जर खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी राहणार आहे. 

हे पण वाचा :- पाऊस आला रे…! अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘त्या’ भागात 9 जूनपासून तीन दिवस पावसाची शक्यता

विशेष म्हणजे उद्या मान्सूनचे आगमन होणार आणि मान्सूनचा जोर 10 ते 12 जून दरम्यान वाढणार असा त्यांचा अंदाज आहे. सोबतच विदर्भात मान्सूनचे आगमन 11 ते 12 जून या काळात होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून 14 जून ते 20 जून पर्यंत महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

या कालावधीत राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल आणि शेतकरी बांधवांच्या 28 जून पर्यंत पेरण्या आटोपल्या जातील असं भाकीत त्यांनी या सुधारित अंदाजामध्ये व्यक्त केल आहे. एकंदरीत आता भारतीय हवामान विभागाचा अंदाज खरा ठरतो की पंजाब डख यांचा अंदाज? हेच विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. 

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत झाला मोठा बदल, कसा असेल बदल? वाचा

Ajay Patil

Recent Posts