Panjabrao Dakh :-संपूर्ण ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने मोठा खंड दिला व त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. खरिपाच्या पिकांची अवस्था दयनीय झाली असून पिकांनी माना टाकलेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड चिंतेत असून चांगल्या पावसाची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. परंतु साधारणपणे आपण गेल्या तीन ते चार दिवसापासूनचा विचार केला तर महाराष्ट्रमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे.
त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडला असून पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये तर अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडला आहे व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळताना दिसून येत असून खरीप हंगामातील पिकांना देखील जीवदान मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर आपण आजचा विचार केला तर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली असून मान्सूनचा जो काही कमी दाब असलेला पट्टा आहे तो सध्या हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून बंगालच्या उपसागरातील संभाव्य अशा कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्यास पोषक हवामान आहे
यामुळेच महाराष्ट्र मध्ये पुन्हा मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र आहे. या सगळ्या सकारात्मक परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये अगदी विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डख यांनी देखील सप्टेंबर महिन्याबाबत पावसाचा अंदाज वर्तवताना काही तारखा सांगितले असून या तारखांना पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे.
काय आहे पंजाबरावांचा सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज?
जर आपण याबाबत सविस्तर माहिती घेतली तर पंजाबरावांनी सप्टेंबर महिन्याच्या बाबत काही महत्त्वाचे अपडेट दिले असून कोणत्या तारखांना पाऊस पडण्याची शक्यता आहे याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की तीन सप्टेंबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे व आज म्हणजे चार सप्टेंबर पासून ते 12 सप्टेंबर पर्यंत राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकणामध्ये पावसाची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
तसेच शेतकऱ्यांना दिलासादायक म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. तसेच आज पासून ते 25 सप्टेंबर पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार असल्याचा महत्त्वपूर्ण अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे. सप्टेंबरच नाही तर ऑक्टोबर महिन्यात देखील राज्यात चांगला व मोठ्या पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे.
त्यामुळे नक्कीच जून आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात भरून निघेल अशी आशा निर्माण झालेली आहे. त्यापाठोपाठ आयएमडीच्या तज्ञांनी देखील सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडणार असला तरी जून आणि ऑगस्टमधील पावसाची तूट भरून काढेल इतका पाऊस पडणार नाही परंतु तो सरासरी पेक्षा कमीच राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे.