Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यात 12 ते 20 जून दरम्यान पावसाचा मोठा खंड पाहायला मिळाला. राज्यात तब्बल आठ-दहा दिवस पावसाने विश्रांती घेतली आणि यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण, आता पुन्हा एकदा पावसाने गती पकडली आहे. राज्यात आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आली आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे.
याशिवाय, मध्य महाराष्ट्रातील नाशिकसह अनेक लगतच्या जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशातच, आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. त्यांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात पुढील पाच दिवसांचे हवामान कसे राहणार या संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिली आहे.
कस राहणार पुढील चार-पाच दिवसांचे हवामान
पंजाबरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रासाठी आगामी पाच दिवस खूपच महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण की या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट राहणार आहे तर काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट राहणार आहे. डख यांनी म्हटल्याप्रमाणे अरबी समुद्राची मान्सूनची शाखा आता प्रबळ झाली असून ती पुढे सरकली आहे.
यामुळे आता महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसणार असा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात या कालावधीत जोराचा पाऊस बरसणार असे पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे. आगामी चार-पाच दिवस मुंबई सह कोकण तसेच आगामी तीन दिवस पुणे आणि सातारा जिल्ह्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच विदर्भात पुढील पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे.
कोकणाबाबत बोलायचं झालं तर कोकणातील रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे. तसेच दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी यावेळी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
अर्थातचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांनी विशेष सावध राहावे असेही आवाहन यावेळी हवामान अभ्यासकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.