Panjabrao Dakh Havaman Andaj : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने ओढ दिल्यानंतर मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण, जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचा जीव खऱ्या अर्थाने भांड्यात पडला. जूनमध्ये पावसाचे प्रमाण खूपच कमी होते.
दुसरीकडे जुलै महिन्याची सुरुवात खराब झाली. त्यामुळे यंदाही 2023 चीच पुनरावृत्ती होणार अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र तसे काही झाले नाही आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असल्याने मुसळधार पाऊस बरसत आहे.
काही ठिकाणी तर अतिवृष्टी सारखा पाऊस झाला आहे. मात्र असे असले तरी काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे ही देखील गोष्ट नाकारून चालणार नाही. अशातच आता पंजाबरावांनी आजपासून अर्थातच 19 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज दिला आहे.
पंजाबरावांच्या मते आज पासून 23 जुलै पर्यंत राज्याच्या राजधानीत अर्थातच मुंबईत आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होईल असेही त्यांनी म्हटले आहे.
पंजाबरावांच्या मते 25 जुलैच्या सुमारास एक कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे आणि यामुळे राज्यात 25 ते 28 जुलै दरम्यान पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे. राज्यात आजपासून 28 जुलै पर्यंत ठिकठिकाणी जोरदार पाऊस होणार असे त्यांनी सांगितले आहे.
दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. विदर्भाबाबत बोलायचं झालं तर या काळात पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये जोराचा पाऊस राहणार आहे. म्हणजेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांमध्ये या कालावधीत पावसाचा अंदाज आहे.
मराठवाडा बाबत बोलायचं झालं तर येथेही या काळात जोरदार पाऊस होणार आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये या काळात चांगला पाऊस होणार असे पंजाब रावांनी म्हटले आहे.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात देखील 18 ते 28 दरम्यान चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात तर अगदी अतिवृष्टी सारख्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये या काळात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे. निश्चितच पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर ज्या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे तेथील शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला तर खरीप हंगामातील पिकांना नवसंजीवनी मिळेल आणि यामुळे वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पिकांची जोमदार वाढ होण्यास मदत मिळणार आहे.