Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे म्हटले जात आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
आजच्या हवामान अंदाजात पंजाब रावांनी पुढील दहा दिवस अर्थातच 28 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाबरावांचा हा नवीन हवामान अंदाज नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
पंजाब रावांनी काय म्हटले
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, 18 जुलैपासून अर्थातच आज पासून राज्यात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. मात्र पावसाचा जोर हा उद्यापासून वाढणार आहे. 19 जुलै पासून 28 जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस होणार आहे.
या दहा दिवसांच्या काळात राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून 23 जुलै पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
25 जुलै दरम्यान पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि त्यामुळे 25 ते 28 जुलै दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे. एकंदरीत 18 ते 28 जुलै दरम्यान राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.
या काळात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारा असा अंदाज पंजाबरावांनी व्यक्त केला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये आणि पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये 18 ते 28 दरम्यान जोरदार पाऊस होणार आहे.
मराठवाडा विभागात देखील आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. या विभागात 18 ते 28 जुलै दरम्यान दोनदा मोठा पाऊस पडणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील 18 ते 28 दरम्यान दोनदा मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात 21 ते 23 जुलै दरम्यान पावसाची तीव्रता राज्यातील इतर भागांच्या तुलनेत अधिक पाहायाला मिळू शकते.
या काळात उत्तर महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील अनेक भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस होणार असे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे. यामुळे आता पंजाब रावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.