Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसा संदर्भात. आज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी २० ते ३० जुलै दरम्यान महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार ? या संदर्भात मोठी माहिती दिली आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर वाढला आहे.
उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तथापि राज्यातील काही भागांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान पंजाबराव डख यांनी आगामी दहा दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून 23 जुलै पर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे.
ज्या गावात पाऊस झालेला नाही तिथे देखील आता पावसाची हजेरी लागणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश सहित संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.
कोकणात आणि मुंबईत मात्र या कालावधीत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. या काळात रिमझिम पाऊस पडत असतानाचं काही ठिकाणी अधून मधून मोठा पाऊसही पडणार असे भाकित पंजाबरावांनी यावेळी वर्तवले आहे.
एकंदरीत ज्या भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मुसळधार पावसासाठी वाट पाहावी लागू शकते असे दिसत आहे. मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस पुढील दहा दिवस सुरूच राहणार आहे.
30 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. या पावसाचा मुक्काम हा उत्तर महाराष्ट्राकडे राहणार असे पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे. खरंतर जून महिन्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही.
विशेष म्हणजे जुलैची सुरुवात देखील अनेक भागांमध्ये निराशा जनक राहिली आहे. जुलै च्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि पावसाला सुरुवात झाली.
दरम्यान आता पुढील दहा दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात महाराष्ट्रात सर्व दुर रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अधून मधून मोठा पाऊस देखील पडणार असेही सांगितले गेले आहे.