Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांनी आज अर्थातच 11 सप्टेंबर 2024 रोजी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. या हवामान अंदाजात पंजाब रावांनी आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी माहिती दिलेली आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
तसेच काही ठिकाणी 13 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस हजेरी लावणार आहे. मात्र 13 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पावसाची उघडीप राहणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तर 12 सप्टेंबर पासूनच पाऊस सुट्टीवर जाणार असे दिसत आहे. बार्शी, धाराशिव, सोलापूर, लातूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर या जिल्ह्यात उद्यापासून अर्थातच 12 सप्टेंबर पासून हवामान कोरडे राहणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
12 ते 13 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातुन पाऊस उघडीप घेईल अन जवळपास 19 ते 20 सप्टेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे. खरे तर सध्या राज्यातील बहुतांशी भागांमध्ये सोयाबीन आणि उडीद सारख्या पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे.
राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील सोयाबीन पीक आता अंतिम टप्प्यात आले आहे. काही ठिकाणी सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू झाली आहे तर काही ठिकाणी येत्या काही दिवसात हार्वेस्टिंगची कामे सुरू होणार आहेत.
दरवर्षी महाराष्ट्रात सोयाबीन हार्वेस्टिंग सुरू झाली की पावसाचा जोर वाढतो. सोयाबीन हार्वेस्टिंगच्या वेळेस दरवर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी सारखा पाऊस पडतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदा मात्र सोयाबीन हार्वेस्टिंग च्या पिरेडमध्ये महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार असल्याचा दावा पंजाब रावांनी केला आहे.
जवळपास 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असून या कालावधीत शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन काढून घ्यावे आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावे असे आवाहन पंजाब रावांनी केले आहे. कारण की 20 तारखे नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे.
19 आणि 20 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होईल आणि पुन्हा एकदा राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे. एकंदरीत 13 सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे.
या कालावधीत खूप मोठा पाऊस पडणार नाही पण विखुरलेला पाऊस राहील. हे दोन-तीन पावसाचा जोर अधिक राहणार नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही. तसेच हे दोन-तीन दिवस उलटलेत की महाराष्ट्रात सर्वत्र हवामान कोरडे होईल. जवळपास 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहील.
मात्र तदनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. यामुळे या काळात सोयाबीनची हार्वेस्टिंग केली तर शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा नवरात्र उत्सवात आणि दसऱ्याच्या काळात सुद्धा पावसाची शक्यता आहे.