Panjabrao Dakh Havaman Andaj : मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी झाला आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जून महिन्यात राज्यातील कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला होता. उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसाचे प्रमाण खूपच कमी होते. पण आता गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि घाटमाथा परिसरावर देखील पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे.
यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना पड रे पाण्या, पड रे पाण्या, कर पाणी पाणी…असे म्हणण्याची वेळ आली आहे. खरंतर यंदा मान्सून काळात चांगला समाधानकारक पाऊस राहणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र जून महिन्यात असे काही घडले नाही.
राज्यात जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. हवामान खात्याने मात्र चालू जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. जुलै महिन्यात राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस म्हणजे 160% पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये 94 ते 104% म्हणजे सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. एकंदरीत हवामान खात्याचा जुलै महिन्याबाबतचा अंदाज आशादायी आहे.
दुसरीकडे, पंजाबराव डख यांनी देखील 10 जुलै पर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या काळात राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आणि छोटे-मोठे तळे भरतील अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे जर असे घडले तर जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना नवीन संजीवनी मिळणार आहे. सध्या खरिपातील पिकांना जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
अशातच भारतीय हवामान खात्याने आणि पंजाबराव डख यांनी जुलै महिन्यात चांगला मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. पंजाबराव डख म्हणतात की, ज्यावर्षी महाराष्ट्रात उत्तरेकडून पावसाला सुरुवात होते त्यावर्षी राज्यातील बहुतांशी भागांमध्ये जोरदार पाऊस पडत असतो.
यंदा देखील महाराष्ट्रात उत्तरेकडूनच पावसाला सुरुवात झाली आहे.त्यामुळे याही वर्षी राज्यात चांगला समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यंदा उत्तरेकडून पावसाला सुरुवात झाली असल्याने बीड, सोलापूर, लातूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगरसह उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा या भागात चांगल्या जोरदार पावसाची शक्यता आहे.
एकंदरीत पंजाबराव यांनी जुलै महिन्यात दहा तारखेपर्यंत विविध भागांमध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज दिला आहे. तसेच त्यांनी यंदाच्या संपूर्ण मान्सून काळात महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे यावर्षी 2023 प्रमाणे दुष्काळ सदृश्य परिस्थिती राहणार नाही अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे.
तथापि गेल्या महिन्यात पावसाने हुलकावणी दिली असल्याने जुलै महिन्यात पाऊसमान कसे राहणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. हवामान खात्याचा आणि पंजाबरावांचा जुलै महिन्याबाबतचा अंदाज खरा ठरतो का याकडे देखील संपूर्ण राज्याचे लक्ष राहणार आहे.