Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरेतर, मार्च महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती.
विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने आणि गारपिटीने त्राहीमाम माजवले होते. पण आता राज्यातील हवामान कोरडे आहे.
हवामान खात्याने उद्यापासून उत्तर भारतात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आपल्या महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आणि सकाळी थंडीचा गारवा जाणवणार असा अंदाज दिला आहे.
पण, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस हजेरी लावू शकतो असा अंदाज दिला आहे.
पंजाबरावांनी आज अर्थातच 10 मार्च 2024 रोजी त्यांच्या अधिकृत youtube चैनल वर एक नवीन हवामान अंदाज जारी केला आहे.
काय म्हणताय पंजाबराव ?
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, आजपासून 18 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार आहे. यामुळे या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांनी आपली सर्व शेतीची कामे आवरून घ्यावीत.
कारण की, 18-19 मार्च नंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. मात्र, हा अवकाळी पाऊस राज्यातील काही मोजक्याच जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार असा अंदाज आहे.
पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, कारंजा, अकोला, अमरावती, चांदूरबाजार, अकोट, बुलढाणा या भागात 18 किंवा 19 मार्च नंतर अवकाळी पावसाची शक्यता आहे.
दुसरीकडे मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान राहील असे यावेळी पंजाब रावांनी म्हटले आहे.
एकंदरीत पूर्व आणि पश्चिम विदर्भ वगळता दुसरीकडे कुठेच पावसाची शक्यता नाहीये. यामुळे पूर्व आणि पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांनी 18 मार्चपर्यंत आपली शेतीची आवश्यक कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन केले जात आहे.