Panjabrao Dakh Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे सावट आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायाला मिळत आहे तर काही ठिकाणी पावसाचे सावट आहे. वादळी पावसामुळे मात्र शेतकऱ्यांच्या शेती पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.
दुसरीकडे उष्णतेची लाट नागरिकांसाठी घातक ठरत आहे. तापदायक उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील अनेक ठिकाणी तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान नमूद केले जात आहे.
विदर्भातील अकोल्यात तर 42 अंश सेल्सिअस पेक्षा अधिकच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि मालेगाव मध्ये देखील तापमान 42 अंश संस्थेच्या आसपास पोहोचले आहे.
यामुळे अनेक ठिकाणी उष्माघाताचे देखील प्रकरणे समोर येत आहेत. उष्णतेची लाट नागरिकांसाठी घातक ठरत आहे. पण, राज्यात काही भागात पावसाचे सत्र सुरू आहे. आज देखील महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात भारतीय हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने आज विदर्भात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असे म्हटले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील आज राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
शिवाय एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कसे राहणार याबाबत देखील त्यांनी मोठी माहिती दिली आहे. एक एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान राज्यात कसे हवामान राहणार? अवकाळी पाऊस हजेरी लावणार की नाही याबाबत त्यांनी डिटेल माहिती दिली आहे.
कसे राहणार एक एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यानचे हवामान ?
एक एप्रिल ते पाच एप्रिल पर्यंत राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. परंतु पाच एप्रिल नंतर महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे.
6 एप्रिल, 7 एप्रिल आणि 8 एप्रिलला महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी यावेळी दिला आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत पावसाचा जोर आता जसा पाऊस पडतोय त्यापेक्षा अधिक राहणार असेही म्हटले आहे. यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांना विशेष सावध राहावे लागणार आहे.