Panjabrao Dakh News : गेल्या सात-आठ दिवसांपासून महाराष्ट्रातून पावसाने पूर्णपणे माघार घेतली आहे. यामुळे शेतकरी बांधव पुन्हा एकदा चिंतेत आले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अशीच परिस्थिती तयार झाली होती. 2023 साली ऑगस्टमध्ये पावसाचा 14 ते 15 दिवसांचा खंड पडला होता. काही ठिकाणी याहून अधिक काळ पाऊस गायब होता.
यंदाच्या ऑगस्ट महिन्यातही आता जवळपास सात ते आठ दिवसांपासून पाऊस गायब झाला असल्याने गतसालासारखीचं परिस्थिती यंदाही उद्भवणार की काय अशी भीती अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हवामानाबाबत मोठी माहिती दिली आहे.
पंजाबरावांचा अंदाज काय सांगतो ?
पंजाबराव सांगतात की, पावसाळ्यात जेव्हा सूर्य मावळत असताना आभाळ तांबडे होते तेव्हा तेथून पुढे 72 तासांनी म्हणजेच तीन दिवसात त्या संबंधित पाऊस पडत असतो. काल राज्यातील काही भागात अशीचं परिस्थिती पाहायला मिळाली होती. त्यामुळे आता या संबंधित भागात पुढील तीन दिवसात पाऊस पडणार अशी शक्यता आहे. दरम्यान पंजाब रावांनी विभागानुसार ऑगस्ट अखेरपर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार याबाबत माहिती दिली आहे.
विदर्भ : डख यांनी म्हटल्याप्रमाणे, पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये 17 तारखेपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. कडक ऊन पडणार आहे. मात्र असे असले तरी चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, अहमदपूर या भागात 17 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आहे. सर्वत्र पाऊस पडणार नाही मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच, विदर्भात 18 तारखेनंतर सर्वदूर पावसाला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी दिला आहे.
मराठवाडा : या भागात सुद्धा 17 तारखेपर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सर्वदूर नाही पण तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असे त्यांनी म्हटले आहे. या भागात 18 तारखे नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र : या भागात 22 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात उष्णता अधिक राहील. मुंबईमध्ये जशी उष्णता जाणवते तशीच उष्णता उत्तर महाराष्ट्रात राहणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्यानंतर मात्र येथे पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र : 17 तारखेपर्यंत या भागात कडक ऊन पडणार अन गर्मी खूप राहणार आहे. परंतु 17 तारखे नंतर हवामानात बदल होईल आणि 18 ऑगस्ट पासून या भागात जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या भागात काही ठिकाणी पुन्हा एकदा पूर परिस्थिती तयार होईल असाही अंदाज त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.