Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे मौसमी पावसा संदर्भात. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज एक महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आणखी चार दिवस पावसाची शक्यता आहे.
आज पासून पुढील चार दिवस म्हणजेच 10 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. सात ते दहा तारखे दरम्यान महाराष्ट्रातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यासोबतच या कालावधीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात सुद्धा पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे. राज्यात या काळात दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाची तीव्रता थोडीशी जास्त राहणार आहे.
या तारखेपासून महाराष्ट्रात कडक सूर्यदर्शन
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 11 ऑगस्ट पासून कडक सूर्यदर्शन पाहायला मिळणार आहे. 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यानच्या 5-6 दिवसांच्या कालावधीत राज्यात सूर्यदर्शन होणार आहे.
म्हणजेच या कालावधीत राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची उघडीप राहणार आहे. या काळात मराठवाड्यातील सर्वच्या सर्व आठ जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात सूर्यदर्शनाची शक्यता आहे.
या काळात उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर मध्ये देखील सूर्यदर्शन राहणार असे पंजाब रावांनी स्पष्ट केले आहे. 11 ऑगस्ट पासून ते 16 ऑगस्ट पर्यंत या जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन होण्याची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे.
मात्र 17 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यात 19 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट या कालावधीत पुन्हा एकदा पावसाची शक्यता पंजाबरावांनी वर्तवली आहे.
तसेच या काळात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी राहणार याबाबतचा सविस्तर अंदाज पंजाबराव येत्या काही दिवसांनी शेतकऱ्यांसाठी जारी करणार आहेत. यामुळे 19 ऑगस्ट पासून महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.