Maharashtra News : दिवाळी एक प्राचीन उत्सव आहे. दिवाळी शरद ऋतूमध्ये साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते. शहरी भागात हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे.
मात्र यंदा अल्प पाऊस झाल्यामुळे बळीराजा अडचणीत असल्याने यंदा दिवाळी सणावर फारसा उत्साह दिसून आला नाही.
अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन उत्पादनात झालेली विक्रमी घट, मका पिकावर पडलेली लष्करी अळी, दूधाचे कमी झालेले दर वाढलेली महागाई, यासह इतर अनेक कारणाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. अशा कठीण परिस्थितीतून ग्रामीण भागातील शेतकरी आपला उदरनिर्वाह करीत आहे.
यात यंदा पाऊस कमी पडल्यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी पुढे राहील की नाही, याची शास्वस्ती नसल्यामुळे रब्बी कांदा, मका, गहु, हरभरा पिकांची यंदा कमी प्रमाणात लागवड होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात यंदा दिवाळी सणावर यंदा निरूत्साह दिसून आला.
शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. निसर्ग साथ देतो, पण भाव राहत नाही, भाव राहतो तर निसर्ग साथ देत नाही, यामुळे अनेकदा शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत जाते.