Punjab Dakh : हवामान तज्ञ पंजाब डख यांनी जवळपास गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी यंदा मान्सूनचे आठ जूनला आगमन होणार असा दावा केला होता. आतापर्यंत ते आपल्या दाव्यावर ठाम देखील आहेत. मात्र राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.यामुळे यावेळी पंजाब डख यांचा अंदाज चुकला आहे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
मात्र डख यांनी चक्रीवादळामुळे सध्या राज्यात पावसाची तीव्रता कमी असल्याचे मत व्यक्त केले आहे. खरंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे मात्र पावसाचा जोर अपेक्षित असा नाही. शिवाय सगळीकडे पाऊस झालेला नाही.
यामुळे शेतकऱ्यांनी डख यांचा यंदाचा अंदाज फोल ठरला असल्याचे सांगितले आहे. अशातच डख यांनी काल अर्थातच 9 जून 2023 रोजी आपल्या अधिकृत यूट्यूब चैनलवर एक नवीन हवामान अंदाज व्यक्त केला आहे.
हे पण वाचा :- कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !
यानुसार राज्यात आज म्हणजे 10 जून पासून ते 14 जून पर्यंत पाऊस राहणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस मात्र सर्व दूर पडणार नसून भाग बदल विखूरलेल्या स्वरूपात पडेल असा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे.
शिवाय 18 जून ते 22 जून दरम्यान राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होणार असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच 26 जूनच्या सुमारास पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होईल असे देखील आपल्या दीर्घकालीन हवामान अंदाजात त्यांनी नमूद केले आहे.
एकंदरीत डख यांचा हा अंदाज खरा ठरला तर उकाड्यापासून हैराण झालेल्या सामान्य जनतेला आणि पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. पण आतापर्यंत पावसाने दिलेल्या हुलकावणीवरून यावर्षी भारतीय हवामान विभागाचा आणि पंजाब डख यांचे हवामान अंदाज चुकलेत हे स्पष्ट होत आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद! सरकारी कर्मचाऱ्यांचा शेतकऱ्यांना मदतीचा हात; अवकाळी पावसाने नुकसानग्रस्तांना कर्मचारी अशी करणार मदत, वाचा…
मान्सून बाबत भारतीय हवामान विभाग काय म्हणतयं?
आठ जूनला मान्सूनच केरळात आगमन झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच 18 जून पर्यंत राज्यातील मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याचे आयएमडीकडून सांगितले गेले आहे. यामुळे यावर्षी मान्सून आगमनाला जवळपास आठ ते दहा दिवसांचा उशीर होत असल्याचे चित्र आहे.
पेरणीबाबत पंजाब डख यांच मत काय?
पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना पेरणीसाठी घाई करू नये आणि शेतात एक हितभर अर्थातच सहा ते सात इंच ओल गेल्यानंतरच पेरणीचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.
कृषी विभागाने देखील शेतकऱ्यांना 80 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणीला सुरुवात करावी असा सल्ला यावेळी निर्गमित केला आहे. निश्चितच, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये आणि पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी अन्यथा शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागू शकते.
हे पण वाचा :- दिलासादायक ! अखेर गारपिटीने नुकसान झालेल्या ‘त्या’ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर, पहा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?