Panjabrao Dakh News : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात दररोज काही ना काही नवीन डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. कुठं पादळी पाऊस आणि गारपीट होत आहे तर कुठं उष्णतेची लाट येत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसहित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाढत्या उकाड्यामुळे आणि उष्णतेमुळे उष्माघाताची भीती भेडसावंत आहे.
तर वादळी पावसामुळे, वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने 20 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नुकताच जारी केला आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आगामी काही दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाव्यतिरिक्त जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील अवकाळी पावसाबाबतचा आपला नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे.
पंजाब रावांनी देखील महाराष्ट्रात पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे हवामान खात्याचा आणि पंजाब रावांचा हा हवामान अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढणार असे चित्र तयार होत आहे.
पंजाबराव डख काय म्हणताय?
पंजाबरावांनी पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? याबाबत नवीन अंदाज जारी केला आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे पुढील तीन दिवस अर्थातच 20 एप्रिल पर्यंत महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे.
डख यांनी या कालावधीत राज्यातील दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या भागात पाऊस पडणार असे म्हटले आहे. एवढेच नाही तर आज आणि उद्या अर्थातच 17 आणि 18 एप्रिलला मराठवाडा विभागात देखील पाऊस हजेरी लावू शकतो असे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
तसेच पुढील तीन दिवस राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विभागातील पुणे आणि सातारा जिल्ह्यात मराठवाडा विभागातील बीड, जालना, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि राजधानी मुंबई या भागात जास्तीच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी यावेळी जारी केला आहे.
यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आगामी तीन दिवस आपल्या शेती पिकांची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मात्र असे असले तरी राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
यामुळे, दिवसा कडक ऊन असताना खूपच आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये असे आवाहन जाणकार लोकांनी केले आहे.