Summer Heat : सध्या तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सियसवर पोहचला आहे. महिनाअखेर तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रचंड उष्णतेमुळे सध्या लोकांना बाहेर फिरणे धोक्याचे बनले आहे.
गेल्या महिनाभरापासून सूर्य आग ओकत असून शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत उष्णतेने लोक हैराण झाले आहे.
आरोग्य विभागाने उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही सूचना दिल्या आहे. उन्हाळ्यात आरोग्याचा समस्या उद्भवत असल्याने तळपत्या उन्हात जाऊ नये. तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे. आहारामध्ये जास्तीत जास्त फळांचा, उसाचा रस घ्यावा. होईल तेवढ थंड जागेवर राहण्याचा विचार करावा. प्रचंड वाढलेल्या उष्णतेचा त्रास होऊ नये, म्हणून दुपारी घराबाहेर जाणे टाळावे, जाणे अनिवार्य असेल तर टोपी, स्कार्फ डोक्याला बांधावा.
तीव्र उकाडा असल्याने दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका. वाढत्या उष्णतेत मद्यसेवन, चहा, कॉफी व उष्ण व फास्ट फुड पदार्थ खाणे टाळावे. वाहने बाहेर उन्हात पार्किंग करुन वाहनांमध्ये लहान मुले किंवा वयोवृद्ध नागरिकांना सोडून जाऊ नये. उन्हाळ्यात मसालेदार चमचमीत पदार्थ खाणे टाळावे. दिवसभर एसीमध्ये राहणे टाळावे. उष्णतेत पाणी आवश्यक असल्याने तहान नसल्यास पुरेसे पाणी प्या, प्रवास करतानाही सोबत पाणी घ्यावे. उन्हाळ्यात सॉफ्ट रंगाचे तसेच कॉटनचे कपडे वापरावे.
घराबाहेर पडताना उन्हाच्या बचावासाठी गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरावे. उन्हाळ्यात अशक्तपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडे जावे. फॅनचा वापर करा, थंड पाण्याने अंघोळ करा बाहेरील वारा घरात येण्यासाठी घराचे खिडक्या दारे खुली ठेवण्याचे आवाहन केले आहे.
हि आहेत उष्माघाताची कारणे
उन्हाळ्यात शेतावर किंवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काच कारखान्यात काम करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे.
तर ही आहेत उष्माघाताची लक्षणे कातडी लालसर होणे, सूज येणे, वेदना, ताप आणि डोकेदुखी हातापायात गोळे, पोटाच्या स्त्रायूमध्ये मुरडा, खूप घाम थकवा, कातडी थंडगार, नाडीचे ठोके मंद, चक्कर, उलटी होणे.
अशा करा उपाययोजना
पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा. उन्हात जाताना टोपीखाली ओलसर कपडा ठेवा. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरणे, उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरणे पाळीव प्राण्यांना सावलीत,
थंड ठिकाणी ठेवा ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. तर हे करू नका शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.