Maharashtra Havaman : राज्यातील बहुतांशी भागांमध्ये थंडीचा लपंडाव सुरू असून, अनेक भागांत तिचे प्रमाण कमी-जास्त होत आहे. सोमवारी राज्यात सर्वात कमी तापमान जळगावमध्ये ९.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवले. दरम्यान, राज्यात थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. तसेच नैऋत्य अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती दक्षिणेकडे सरकली आहे. त्यामुळे किमान तापमानावर परिणाम होत आहे. विदर्भ व मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी कायम आहे.
काही भागांत किमान तापमानात चढ-उतार होत आहे. दरम्यान, राज्यात सर्वात जास्त तापमान रत्नागिरीमध्ये ३५.६ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, राज्यातील किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
सोमवारी मध्य महाराष्ट्रातील पुण्यात ११.७ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान होते, तर जळगाव ९.६, कोल्हापूर १६.४, महाबळेश्वर १४.९, मालेगाव १३.२, नाशिक १२.५, सांगली १५, सातारा १३.८, सोलापूरमध्ये १६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले.
कोकण भागातील मुंबईत २१.८, सांताक्रुझ १९.४, रत्नागिरी २०.७ व डहाणूमध्ये १८.१ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यातील धाराशीवमध्ये १६.२, छत्रपती संभाजीनगर १२.१, परभणी १३.४, नदिड १३.८ तर बीडमध्ये १२.५ अंश सेल्सिअसवर थंडीचा पारा होता.
विदर्भातील अकोलामध्ये १३.५, अमरावती १३.३, बुलढाणा १३.८, ब्रह्मपुरी १३.६, चंद्रपूर ११.४, गोंदिया १०.५, नागपूर १३.७, वर्धा १४, वाशीम ११.६, तर यवतमाळमध्ये १२.२ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले.