हवामान

Maharashtra Weather Update : राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी ! पुढील दोन दिवस…

Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी अंरिंज व यलो अलर्ट देण्यात आला असून जोरदार पाऊस व गारा पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा पूर्वेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वा-यांशी संयोग झाला आहे.

त्यामुळे कोकण- गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बाष्प वाहून येत असल्यामुळे अनुकूल वातावरण तयार होऊन पाऊस पडला आहे. नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यातील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचे पावसासह गारपीट झाली.

२७ व २८ नोव्हेंबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात यलो अलर्ट असून येथे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पालघरमध्ये दमदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर काही भागात गारा पडणार आहेत. विदर्भात ऑरेंज अलर्ट असून अकोला, बुलढाणा, वाशिममध्ये मुसळधार पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ढगाळ हवामान व पाऊस यामुळे तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये अवकाळीचे ८ बळी

गुजरातमध्ये झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडून ८ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले, गडगडाटासह झालेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे नुकसान झाले. या आपत्तीमुळे पशुधनाचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती रविवारी अधिकाऱ्याने दिली.

राज्यातील २५१ तालुक्यांपैकी २२० तालुक्यामध्ये शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून पुढील १० तासांमध्ये ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. यादरम्यान रविवारी सकाळी अहमदाबाद शहरात १५ मिमी पावसाची नोंद झाली. सायंकाळीदेखील या शहरात पावसाच्या सरी बरसल्याने लोकांना घराबाहेर पडता आले नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts