Weather Update : राज्यात काल दुपारपासून हवामानात अचानक मोठा बदल पाहायला मिळत आहे. पूर्व मौसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असून राज्यात काल दुपारपासून ठीक-ठिकाणी वादळी पाऊस कोसळत आहे. यामुळे मात्र मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे.
तसेच पशुधनाची देखील मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. परंतु या वादळी पावसामुळे राज्यात उकाड्याचे प्रमाण कमी झाले आहे. उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी आज देखील पोषक हवामान आहे.
यामुळे राज्यातील काही जिल्ह्यात आज भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निश्चितच या वादळी पावसामुळे हवामान आल्हाददायक बनले असून सामान्य नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.
दरम्यान मान्सूनची वाट पाहणाऱ्या बळीराजाला देखील यामुळे दिलासा मिळत आहे. मात्र मान्सूनचे आगमन काल अर्थात चार जून 2023 रोजी केरळमध्ये झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खरंतर, भारतीय हवामान विभागाने काल केरळमध्ये मान्सूनच आगमन होईल असा अंदाज व्यक्त केला होता.
पण, भारतीय हवामान विभागाचा हा अंदाज पुन्हा एकदा फोल ठरला असून यंदा पुन्हा मान्सूनने हवामान विभागाच्या अंदाजाला हुलकावणी दिल्याचे चित्र आहे.
दरम्यान, मान्सूनचे केरळमध्ये येत्या तीन ते चार दिवसात आगमन होण्याची शक्यता आहे. अर्थातच, यावर्षी 2019 सारखीच आठ जूनला केरळमध्ये मान्सून आगमन होण्याची परिस्थिती तयार होत आहे.
हे पण वाचा :- सावधान ! अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यात आज गारपीटीची शक्यता; तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान? पहा IMD चा अंदाज
आज कुठं पडणार पाऊस !
आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणातील प्रामुख्याने दक्षिण कोकणात आज पूर्व मौसमी पाऊस पडणार असे सांगितले गेले आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रमधील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस पडणार आहे.
हे पण वाचा :- यंदा उन्हाळी कांद्याच्या दरात वाढ होणार का? काय राहणार भविष्यातली परिस्थिती, वाचा…