Maharashtra News : राज्यात पाऊस सक्रिय असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत रविवारी पावसाने हजेरी लावली आहे. तसेच कोकणातील रत्नागिरीत ९७ मिमी इतका मुसळधार पाऊस झाला आहे.
सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात यलो अलर्ट दिला असून काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची (मान्सून) वाटचाल सुरू आहे. राजस्थानचा आणखी काही भाग, पंजाब, हरयाणा, चंडिगड, दिल्लीसह, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पश्चिम उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेशातून मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. सध्या कमी दाबाचा पट्टा राज्यावर कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात पाऊस बरसत आहे. येत्या मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यामध्ये १४ मिमी, सांगली १, सोलापूर ४, महाबळेश्वर २७, कोल्हापूर १ तर लोहगावमध्ये ०.६ मिमी पावसाची नोंद झाली. कोकणातील रत्नागिरीत मुसळधार पाऊस झाला असू ९७ मिमी पावसाची नोंद झाल आहे.
तसेच मुंबईत ०.२ मिम तर मराठवाड्यातील बीडमध्ये मिमी व विदर्भातील चंद्रपूरमध्ये तर गोंदियामध्ये ०.६ मिमी पाऊ नोंदवण्यात आला. २ ऑक्टोब रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड व विदर्भात यलो अलर्ट असू मेघगर्जना आणि विजांच्य कडाकडाटासह पावसाची शक्यत आहे.
तर कोकणात काही ठिकाण पाऊस पडणार आहे. त्यानंतर ते ४ ऑक्टोबरदरम्यान राज्या तुरळक ठिकाणी पाऊस पडण असून ५ ते ८ ऑक्टोबर रोज हवामान कोरडे राहणार असल्या कळवण्यात आले आहे.