मंत्री थोरातांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेत समविचारी नेते एकत्र !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- नगर सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याची कामधेनू जिल्हा बँक मागील धुरीणांनी राजकारण विरहित सांभाळली. ही परंपरा महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी जोपासली.

समविचारी नेत्यांना एकत्र घेत शेतकरी व सर्वसामान्यांचा विकास हेच ध्येय ठेवून काम सुरू असल्याचे प्रतिपादन नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना विश्रामगृहात अमृत उद्योग समूहाच्या वतीने जिल्हा बँकेवर अ‍ॅड. माधवराव कानवडे व गणपतराव सांगळे यांची बिनविरोध निवडीबद्दल आयोजित सत्कारप्रसंगी आमदार डॉ. तांबे बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, संचालक इंद्रजित थोरात, लक्ष्मण कुटे, रामदास वाघ, बाजार समिती सभापती शंकरराव खेमनर, सभापती सुनंदा जोर्वेकर, मीना शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, निर्मला गुंजाळ, साहेबराव गडाख, चंद्रकांत कडलग, आनंद वर्पे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe