लंप्पी या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे झाली बाधित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राहाता शहरात गेल्या काही दिवसांपासून जनावरांवरील लंप्पी या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधित झाली होती.

त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. जनावराच्या साथीच्या रोगाची तालुका लघु चिकीत्सालयाकडून गंभीर दखल घेतली असून बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत.

तातडीने एक हजार लशींच्या डोसची मागणी करण्यात आली असल्याची माहिती डॉ. एस. जी. बन यांनी दिली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राहाता शहरात लंप्पी रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधित झाली.

खासगी डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर उपचारावर शेतकर्‍यांची लूट होत होती व या साथीचा संसर्ग परिसरात वाढत असल्याने शेतकर्‍यांनी या प्रश्नी पशुवैद्यकीय विभागाने लक्ष घालण्याची मागणी केली होती.

नुकतेच राहाता येथील पशु विभागाच्या पथकाने परिसरातील बाधित जनावरांवर उपचारही सुरू केले असून या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी तातडीने एक हजार लसींच्या डोसची मागणी जिल्हा पशु विभागाकडे केली आहे.

तसेच अशा बाधित असलेल्या जनावरांची माहिती नागरिकांनी तातडीने तालुका लघु चिकीत्सालयाला कळवावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe