अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-कोपरगाव तालुक्यात चंदनाच्या झाडांची चोरी करणा-या सहा आरोपींना पोलिसांनी पकडले आहे.
दरम्यान हि कौतुकास्पद कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर शहर व जिल्ह्यात वारंवार चंदनाच्या झाडांच्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या.
त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटके यांनी चंदन चोरीचे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते.
दरम्यान श्री कटके यांना खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली कि , काही इसम हे हुंडाई कंपणीचे काळे रंगाचे कारमधून चंदनाची लाकडे घेवून श्रीरामपूर – नेवासा रोडने चांदा गावचे दिशेने जात आहेत.
या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ नगर – औरंगाबाद रोडवरील घोडेगांव येथील शनिशिंगणपूर चौक येथे जावून सापळा लावून काहींना ताब्यात घेतले.
यामध्ये पोलिसांनी शितल उर्फ सिताराम ऊर्फ गणेश भानुदास कु-हाडे (वय 32), करण विजय कु-हाडे (वय 25, रा.चितळी स्टेशन, ता.राहाता), परमेश वैश्या भोसले (वय 26, भेंडोळा, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद),
सतिष मच्छिंद्र शिंदे (वय 32, रा.चोभे काॅलनी, बोल्हेगाव, अहमदनगर), संतोष मारुती शिंदे ( वय 32), गणेश विष्णू गायकवाड (वय 26, रा.मोंढ्याचे मागे, गंगापूर, जि.औरंगाबाद) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून एकूण ३ लाख ४८ हजार रु . किं . चा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे अधिक तपास केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन कोपरगांव तालूका , तोफखाना पो.स्टे . येथील अभिलेखाची पाहणी करुन चंदन चोरीचे गुन्ह्यांची माहिती घेतली असता जप्त करण्यात आलेल्या चंदन चोरीचे प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|