नणंद व सासऱ्याकडून विवाहितेस मारहाण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- नणंद व सासऱ्याने विवाहितेस मारहाण केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे.

याबाबत विवाहिता शिल्पा प्रदिप रांका यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले, की शिर्डी शहरात साकुरी शिव रस्त्यानजिक आपण पती, सासु, सासरा व लहान मुली समवेत रहात आहे.

दि. १८ मार्च रोजी घरी धुणे धुत असताना माझी नंनद रेखा पुर्वेस (रा. हडपसर, पुणे) हिने दरवाजा वाजवला असता घरात प्रवेश केल्यावर तीने ‘घर खाली कर, घरात राहू नको’, असे म्हणत शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

‘रुम खाली केली नाही, तर तुला व तुझ्या लहान मुलीला जीवे मारुन टाकु, तुझ्या पतीचे दुसरे लग्न करुन देऊ’, असे म्हणाली. सासरे शांतीलाल रांका (रा. पुण) यांनीदेखील मला मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देऊन घरात कोंडून निघून गेले.

अशी तक्रार शिर्डी पोलिसांत १९ मार्च रोजी शिल्पा रांका यांनी दिली. तीवरून शिर्डी पोलिसांनी सासरा शांतिलाल रांका व नंणद रेखा पुर्वेस या दोघा आरोपींविरोधात भा.दं.वि. कलम ३२३, ३४, ३४२, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe