अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येमुळे हाॅस्पिटलमध्ये बेडची कमतरता भासत आहे. कोविड संक्रमित आढळल्यास नेमके काय करावे हे रुग्णांना व नातेवाईकांना समजत नाही.
अशा भांबवलेल्या परीस्थितीत या रुग्णांच्या व सामान्य नागरिकांच्या मदतीला युवक काँग्रेसची आरोग्य दूत टीम मदतीला धावून येणार आहे, अशी माहिती जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी दिली.
मागच्या लॉकडाऊन काळात युवक काँग्रेसने रक्तदान शिबिरे घेऊन राज्यात साडे अठ्ठावीस हजार रक्ताच्या बाटल्या जमा केल्या होत्या. यावेळी किमान ३० हजार बाटल्यांचे उद्दिष्ट आहे.
मिनी लॉकडाऊन संपल्यानंतर उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या १४ आरोग्य दुतांचा सन्मान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
बेरोजगार झालेल्या मजूर कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, मास्क-सॅनिटायझरचे वितरण केले जाणार आहे. जनजागृती, रक्तदान शिबिर, कोविड केंद्रांच्या अडचणी सोडवण्यात येणार आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|