अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तुफान गारांसह धो-धो पाऊस कोसळला यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
अगोदरच करोणाचा कहर करोणा त्यात आस्मानी संकटाची बळीराजावर अवकळा पसरली आहे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात मंगळवारी दुपारी अचानक आलेल्या गारांचा पावसाने काढणीला आलेला कांदा पावसाने भिजून गेला असून गहू, भुईमूग, मका या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तसेच आंबा, संत्री ,डाळिंब व पेरू फळबागाचे मोठे नुकसान झाले आहे.आधीच करोनामुळे होणाऱ्या लॉकडाऊन मुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे त्यातच या अस्मानी संकटामुळे ओढावलेल्या अवकाळी पावसाने बळीराजा वर मोठी अवकळा आणली आहे.
अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी नेत्यांनी मधून होत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|