लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यास ‘एसीबी’ पथकाने रंगेहाथ पकडले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-दारु विक्री व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता घेणाऱ्या तोफखाना पोलीस ठाण्याचे

पोलिस हवालदार बार्शिकर काळे याला रंगेहाथ पकडण्याची कारवाई नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.27) केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचा दारु विक्री व्यवसाय असुन हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 15 हजार रु लाचेची मागणी पोलीस कर्मचारी काळे यांनी तक्रारदार यांचेकडे केली.

दरम्यान याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी दाखल केली होती. त्यानुसार 26 एप्रिल 2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी पो.ह. काळे यांनी तक्रारदार यांचेकडे 15 हजार रु लाचेची मागणी पंचा समक्ष केली.

तडजोड अंती 10 हजार रुपये देण्याचे ठरल्याने मंगळवार दि.27 एप्रिल 2021 रोजी आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान 10 हजार रु लाचेची रक्कम पंचा समक्ष कॉटेज कॉर्नर, नगर मनमाड हायवे येथे स्विकारली असता, पो.ह.काळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe