अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- देशात आज पाच राज्यांच्या मतमोजणीबरोबरच महाराष्ट्र राज्यातील पंढरपूर -मंगळवेढा येथील विधान पोटनिवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागून होते.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका मिळाला आहे. भाजपचे समाधान आवताडेंनी हजारो मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. अद्याप याची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.
मंगळवेढ्याची मतमोजणी 20 ते 38 या फेरींमध्ये झाली आणि तो भाग आवताडेंचा बालेकिल्ला म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे 19 व्या फेरीनंतरच भाजप कार्यकर्त्यांमध्ये विजयी आनंदाचं वातावरण पाहायला मिळत होतं.
समाधान आवताडे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती.
या निवडणुकीत राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या मुलाला म्हणजेच भागीरथ भालके यांनी तिकट देत निवडणूक लढविण्यास सांगितलं. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली होती.
दोन्ही पक्ष आपआपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. या प्रयत्नात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची कॉपी करत पंढरपूर येथे पावसात सभा घेतली.
शरद पवार यांनी साताऱ्याच्या पावसात ज्याप्रकारे आग लावली त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी प्रयत्न केला परंतु पंढरपूरच्या पावसात मात्र साताऱ्याच्या पावसा इतका जोर दिसला नाही.
मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा दारुन पराभव केला आहे. याची औपचारीक घोषणा लवकरच होईल.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|